Thursday, 10 December 2020

Tujvin Bhima Ha

 तुजवीण भीमा हा वाटतो संसार मज सुना

नयनात अश्रुंच्या सरी समजाऊ मी कुणा || ध्रु||

नयनी तू दिसे परी बघतो चहूकडे 

दलितांची दैना पाहुनी हा ऊर धडधडे

देऊ कशी सांत्वना भारावल्या मना || १ ||

अंधार होता भूवरी तू दीप लाविला 

घटनापती तू भारताचा रत्न शोभिला 

साधिले कार्य तू महान फेडू कसे ऋणा || २ ||

लिहिण्या मधुर गीते तुझ्या गुणगौरवावरी 

पांघर कृपेची गोधडी गोवर्धनावरी 

देईल हसतमुखे तुझी जनतेस कल्पना  || ३ ||

गीतकार .... गोवर्धन 




Friday, 27 January 2017

कालकथित बाबुरावजी जाधव यांची मुलाखत

बाबुरावजी जाधव

कालकथित बाबुरावजी जाधव 

अम्बेडकरी सांस्कृतिक चळवळ मधील अग्रगण्य नाव म्हणजे बाबुरावजी जाधव. यांचे आपल्यामाधुन जाणे हे कधी ही न भरून पोकली निर्माण झालेली आहे. मी त्यांची मुलाखत आपणासमोर सादरकरतो आहे.

Youtube Link 

Saturday, 10 December 2016

शंकरनाथ कांबळे

शंकरनाथ कांबळे (एस. के. कांबळे ) हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. डिलाइल रोड मुम्बई येथे त्यांचे जलसा मंडळ होते. १९३९ सालच्या आधीचा हा जलसा असावा. यांच्या या जलसा मंडळांचे प्रयोग मुम्बई परिसरातील अनेक ठिकाणी झालेले आहेत. पुढे १९५६ पर्यन्त जवळपास या जलसा प्रयोगशील पद्धतीने डॉ. बाबासाहेबांच्या विचार अनेक दुर्गम तसेच दुर्मिळ ठिकाणांवर पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आपल्याला बघायला मिळेल. 

Tuesday, 6 December 2016

दामोदर जनार्दन अहिरे

दामोदर जनार्दन अहिरे हे सुद्धा आम्बेडकरी सांस्कृतिक परंपरेतील अतिशय नावाजलेल्या नावांपैकी पहिल्या पिढीचे एक कलावंत आहेत. यानी १९३४ च्या सुमारास आम्बेडकर प्रचारक जलसा मंडळ स्थापन केले आहे. यांच्या जलसा मंडळ चे सादरीकरण जवळपास १९४८ पर्यन्त अविरत सुरु होते. 

Tuesday, 29 November 2016

शिवराम सावळाराम गडकरी

शिवराम सावळाराम गडकरी यांचा जन्म १९१०साली अपशिंगे येथे झाला. शिवरामजी यांनी सातारा जिल्हा समतावादी जलसा स्थापना केली. या समतावादी जलसा मंडळाने आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा झंझावाती प्रचार प्रसार केला.  हा  जलसा आम्बेडकरी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जलसे म्हणूनच प्रसिद्ध झाले. शिवराम गडकरी हे आपल्या जलस्यात इतर जलससकारांचे वग, फार्स, गाणी सुद्धा सादर करत. तसेच ते महार वतन, सावकारी, शिक्षण, अंधश्रद्धा हे वग सादर करत असे. धर्मान्तर या विषयावरही ते वग सादर करीत असे. "समतेचे रणशिंग" या नावाचे पुस्तक सुद्धा  शिवराम गडकरी यांचे प्रसिद्ध आहे. जलसा सादरीकरणाच्या शेवटी भैरवी म्हणून पुढील गीत गायले जात. 
                                            

                                       "तुम्हा आमचा जोहार भीमरावाचा आधार 
                                        कवी गडकरयांचा सार।  जना विनवी वारंवार।  करा ऐक्याचा प्रचार "