Monday, 21 November 2016

रामचंद्र हणमंत आडांगळे

आम्बेडकरी जलसकार तसेच कलाकार 
रामचंद्र हणमंत आडांगळे यांचे गाव धांदरफले (थोरले ), ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथील आहेत.  १९३२ साली फेब्रुवारी महिन्यात नायगाव भागातच स्वतःचे संगीत सुबोध जलसा मंडळ स्थापन केले. आडांगळे यांचा जलसा प्रथम महिमत साहेबांच्या घरी दादर, मुम्बई येथे  १९३४ मधे झाला. 
             आडांगळे यांनी तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा तीनही विषयावर फार्स लेखण केलेले आहेत. यामधे मंदिर प्रवेशाचा फार्स(ब्राह्मण व महार संवाद -१९३२ ),
पराळया म्हसोबा (अंधश्रद्धेवरील फार्स-१९३३ ), 
चिंगुताईचा फार्स (विधवा केशवपन-१९३४ )
                आडांगळे यांनी "भीम मळा " नावाने दीर्घकवन लिहिलेले आहे ऐतिहासिक दृष्टया फार  आहे. यांनी बाबासाहनचे गुणगौरव करणारे एकूण ६ गण रचलेले आहेत. पहिल्या गणामधे ते म्हणतात 
         " दिनदलित ईश्वरा प्रथम नमो आम्बेडकरा // धृ //
           
            कार्यारंभी नमो दलित नायका 
            सर्व गुणसम्पन्न दृष्टरूढ़ि विध्वंसका 
            समाजसुत्र चलकाय  नमः 
            तुज नमो सत्यज्ञान प्रकाशाय नमः 

No comments:

Post a Comment