शंकरनाथ कांबळे (एस. के. कांबळे ) हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. डिलाइल रोड मुम्बई येथे त्यांचे जलसा मंडळ होते. १९३९ सालच्या आधीचा हा जलसा असावा. यांच्या या जलसा मंडळांचे प्रयोग मुम्बई परिसरातील अनेक ठिकाणी झालेले आहेत. पुढे १९५६ पर्यन्त जवळपास या जलसा प्रयोगशील पद्धतीने डॉ. बाबासाहेबांच्या विचार अनेक दुर्गम तसेच दुर्मिळ ठिकाणांवर पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केलेले आपल्याला बघायला मिळेल.
Ambedkarite geetkaar and gaayak information and contributions to ambedkarite movement
Saturday, 10 December 2016
Tuesday, 6 December 2016
दामोदर जनार्दन अहिरे
दामोदर जनार्दन अहिरे हे सुद्धा आम्बेडकरी सांस्कृतिक परंपरेतील अतिशय नावाजलेल्या नावांपैकी पहिल्या पिढीचे एक कलावंत आहेत. यानी १९३४ च्या सुमारास आम्बेडकर प्रचारक जलसा मंडळ स्थापन केले आहे. यांच्या जलसा मंडळ चे सादरीकरण जवळपास १९४८ पर्यन्त अविरत सुरु होते.
Tuesday, 29 November 2016
शिवराम सावळाराम गडकरी
शिवराम सावळाराम गडकरी यांचा जन्म १९१०साली अपशिंगे येथे झाला. शिवरामजी यांनी सातारा जिल्हा समतावादी जलसा स्थापना केली. या समतावादी जलसा मंडळाने आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा झंझावाती प्रचार प्रसार केला. हा जलसा आम्बेडकरी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जलसे म्हणूनच प्रसिद्ध झाले. शिवराम गडकरी हे आपल्या जलस्यात इतर जलससकारांचे वग, फार्स, गाणी सुद्धा सादर करत. तसेच ते महार वतन, सावकारी, शिक्षण, अंधश्रद्धा हे वग सादर करत असे. धर्मान्तर या विषयावरही ते वग सादर करीत असे. "समतेचे रणशिंग" या नावाचे पुस्तक सुद्धा शिवराम गडकरी यांचे प्रसिद्ध आहे. जलसा सादरीकरणाच्या शेवटी भैरवी म्हणून पुढील गीत गायले जात.
"तुम्हा आमचा जोहार भीमरावाचा आधार
कवी गडकरयांचा सार। जना विनवी वारंवार। करा ऐक्याचा प्रचार "
Sunday, 27 November 2016
Friday, 25 November 2016
केरुजी अर्जुन घेगड़े
केरुजी अर्जुन घेगड़े हे "महाराचं प्वार बिट्या लई हुशियार " या प्रसिद्ध कवनासाठी आम्बेडकरी जनतेत खुप मशहूर आहेत. पहिल्या पिढीतील हे जलसाकार होते. घेडगे हे उपजतच कवी आणि शाहिर होते. १९३४ च्या सुमारास त्यानी आपल्या साथीदारांसोबत वडाळा, मुम्बई येथे स्वतःचे जलसा मंडळ स्थापन केले. १९३१ क्या सुमारास एक सत्त्याग्रहाचा पोवाड़ा लिहिला. बहुधा ही त्यांची पहिली रचना असावी. घेगड़े यांनी खुप पुस्तिका लिहिलेल्या आहेत. यामधे १. अस्पृश्य तारा मावळला, २. विद्वानास वंदन , ३. स्वातंत्र्याची मोहिम, ४. मृतूच्या जबड्यात, ५. दलित समाजोन्नतीपर गाणी, म्हणी, उखाणे वगैरे, ६. दलित राष्ट्र पद्द्यावलि हे आहेत. घेगड़े यांचे सर्वात लोकप्रिय गीत महाराच प्वार बिट्या लइ हुशियार हे दलित राष्ट्र पद्द्यावलि या पुस्तकामधे समाविष्ट आहे. ही रचना १९३८ सालची आहे. याच वर्षी १२,१३ फेब्रुवारी रोजी मनमाड येथे भरलेल्या मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषदेस डॉ. बाबासाहेब आम्बेडकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याचवेळी यावेळी शाहिर घेगड़े यानी प्रथम ही रचना सादर केली.
घेगड़े यांनी हिंदी राजकारणाचे बाजार या शीर्षकाची कविता राजकीय, व्यंगात्मक व रूपकात्मक आहे. तत्कालीन राजकारणात कॉंग्रेस, हिन्दू महासभा, मुस्लिम लीग व कम्युनिस्ट पक्ष स्वराज्य हे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन आपआपली भूमिका वठवित होते. या स्वराज्याच्या बाजाराला निघालेल्या विविध पक्षरूपी गौळणीचे स्वभाव, धेय्यधोरणे, राजकीय भूमिका कशा होत्या याचे मार्मिक चित्र रंगविताना घेगड़े म्हणतात
हिंदी राजकारणाच्या बाजारी
निघाली कॉंग्रेसची वृद्ध नारी।
हठवादी टी भारी असे
अहिंसेचे टीला भरले पिसे।
तत्व हुकली, मार्ग चुकली
स्वराज्य मिळेल कैसे ?
Tuesday, 22 November 2016
दिनकर भीमाजी भोसले
आम्बेडकरी सांस्कृतिक जलसाकारांच्या पहिल्या पिढीतील जेष्ठ जलसाकार म्हणून प्रचलित आहेत. त्यांचे मूळ गाव धोंडेजगाव, ता. वाल्हे, पुणे आहे. मुम्बई येथील सिमेंट चाळ, नायगाव , दादर येथे राहत. त्यांनी "पुणे जिल्हा युवक संघ जलसा मंडळाची स्थापना १९३२ ला केली. जलसा सादरीकरण जवळपास १९३२ १९३७ या दरम्यान खुप प्रखरतेने कार्यरत होता.
Monday, 21 November 2016
रामचंद्र हणमंत आडांगळे
आम्बेडकरी जलसकार तसेच कलाकार
रामचंद्र हणमंत आडांगळे यांचे गाव धांदरफले (थोरले ), ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथील आहेत. १९३२ साली फेब्रुवारी महिन्यात नायगाव भागातच स्वतःचे संगीत सुबोध जलसा मंडळ स्थापन केले. आडांगळे यांचा जलसा प्रथम महिमत साहेबांच्या घरी दादर, मुम्बई येथे १९३४ मधे झाला.
आडांगळे यांनी तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि धार्मिक अशा तीनही विषयावर फार्स लेखण केलेले आहेत. यामधे मंदिर प्रवेशाचा फार्स(ब्राह्मण व महार संवाद -१९३२ ),
पराळया म्हसोबा (अंधश्रद्धेवरील फार्स-१९३३ ),
चिंगुताईचा फार्स (विधवा केशवपन-१९३४ )
आडांगळे यांनी "भीम मळा " नावाने दीर्घकवन लिहिलेले आहे ऐतिहासिक दृष्टया फार आहे. यांनी बाबासाहनचे गुणगौरव करणारे एकूण ६ गण रचलेले आहेत. पहिल्या गणामधे ते म्हणतात
" दिनदलित ईश्वरा प्रथम नमो आम्बेडकरा // धृ //
कार्यारंभी नमो दलित नायका
सर्व गुणसम्पन्न दृष्टरूढ़ि विध्वंसका
समाजसुत्र चलकाय नमः
तुज नमो सत्यज्ञान प्रकाशाय नमः
Friday, 18 November 2016
जलसाकार जगताप-भालेराव
जगताप यांनी आपला सहकारी भालेराव यांच्या सोबत १९३३ च्या सुमारास कल्याण कोलसेवाडी या भागात जलसा मंडळ स्थापन केले. " जगताप-भालेराव " या नावाने त्यांचा जलसा प्रसिद्ध होता. १९४२ साली जगताप यांनी आपला हा जलसा नव्याने भीमराव नारायण निरभवने या नविन सहकाऱ्यासोबत "भिमतत्व जलसा मंडळ" स्थापन केले. जगताप-निरभवने यांचा है जलसा १९५६ पर्यन्त सातत्याने सुरु होता. वाघचौरे व ढेंगळे यांनी जगताप-निरभवने यांच्या अनुकरणातून १९४४ मधे वाकडीवालधुनी कल्याण येथे सत्कार्य प्रचार जलसा मंडळ स्थापन केले.
Monday, 14 November 2016
पांडुरंग गोविन्द पवार
आम्बेडकरी सांस्कृतिक परंपरेतील अजोड़ योगदान असलेले कलाकार अशी ओळख असलेले पांडुरंग गोविन्द पवार यांनी १९३२ साली डिलाइल रोड, मुंबई येथे "बहिष्कृत हितचिंतक सामाजिक जलसा मंडळाची" स्थापना केली. पवारांनी दलित हित शत्रुला ४० सवालांची लोखंडी चन्याची जबर मेजवानी देऊन त्यांचे थोबाड बंद केले" या शब्दात अप्पासाहेब रणपिसे यांनी पवारांच्या जलशांचा गौरव केलेला आहे.
Thursday, 10 November 2016
काशीनाथ अहिरे
अहिरे हे मुलचे टाकली, पोस्ट. लासलगांव, ता. निफाड़, जि. नाशिक रहिवासी होते. यांनी परल एल्फिस्टन रोड येथे निर्भळ तरुण जलसा मंडळाची स्थापना केली व आम्बेडकरी चळवळीला वाहून घेतले. १९३३ ते १९४८ असा एकूण १५ वर्ष जवळपास है जलसा चलला. त्यांच्या जलसयांची गीत रुपाने पुस्तके सुद्धा "सामाजिक पड़े " या नावाने प्रसिद्ध आहेत.
Wednesday, 9 November 2016
शंकर पवार उर्फ़ कवी शेखर
शंकर पवार हे भीमराव करदक यांचे समकालीन, समवयस्क जलसाकार होते. शंकर पवार यांनी कवी शेखर या टोपण नावाने १९१८ सालापासून काव्यलेखन केलेले आहेत. "अस्पृश्यांचे धेय्य" या नावाची त्यांची काव्यरचना १८/१०/१९१८ या साल ची आहे. "सत्त्याग्रहीस" या शीर्षकाची काव्यरचना २१/११/१९२८ ची आहे. "सत्त्याग्रहास चला " ही रचना त्यांनी ५/८/१०३० ला लिहिली. हे आणि आशा प्रकारच्या रचना त्यांनी रणभेरी या संकलित पुस्तकाचे प्रकाशन १२/१२/१९३१ ला स. रा. गायकवाड़ यांच्या हस्ते झाले होते.
१९३३ साली कवी शेखर यानी लिहिलेला "अस्पृश्य समाजाला इशारा" है पोवाड़ा गणपतराव खरात यानी प्रकाशित केला.
Tuesday, 8 November 2016
स्व. विजयानंद जाधव
आम्बेडकरी सांस्कृतिक परंपरेतील एक अजोड़ व्यक्तिमत्व आहे. हे एक कवी, गायक, तसेच संगीतकार सुद्धा आहेत. त्यांनी मराठी हिंदी भाषेतील अनेक गीते लिहिली आहेत. परंतु आम्बेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन अत्यंत भावनात्मक गीते लिहिली आहेत. त्यांचे विशेष गाजलेले गीत.... लय मजबूत भीमच किल्ला,
मिलते तुपाची पोली भीमा तुझ्यामुळे,
भीमा तू गेल्यापाटही उन्हाळा झाला सारा
हे विशेषत्वाने गेल जातात.
Monday, 7 November 2016
भीमराव करदक
अम्बेडकरी गीत गायन परंपरेतील आद्य कलाकार आहेत.
यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने आम्बेडकरी समतामूलक तत्वे संपूर्ण सभोवताली प्रसारित केले ते सुद्धा आपल्या अतुलनीय अशा प्रस्तुतीने.
आम्बेडकरी जलसे
या सादरीकरण अंगाने त्यांनी अनेक विषयावर अचुक आणि मार्मिकपणे लेखण केले.त्यात प्रामुख्याने भीमराव करदक १९२२ मधे इंग्रजी दूसरीत असताना पहिली विडंबनात्मक कविता लिहिली.
अस्पृश्य बांधवांनो वडिलांची चाल सोडा
पूर्वीच्या चालीरीती मेलेले मास कहती
वाईट झाली आपुली स्थिति कोणी ना आपणा शिवती
हे काव्य त्यांनी महरकीच्या फार्स मधे लिहिलेले आहे.
अम्बेडकरी गीत गायन परंपरेतील आद्य कलाकार आहेत.
यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने आम्बेडकरी समतामूलक तत्वे संपूर्ण सभोवताली प्रसारित केले ते सुद्धा आपल्या अतुलनीय अशा प्रस्तुतीने.
आम्बेडकरी जलसे
या सादरीकरण अंगाने त्यांनी अनेक विषयावर अचुक आणि मार्मिकपणे लेखण केले.त्यात प्रामुख्याने भीमराव करदक १९२२ मधे इंग्रजी दूसरीत असताना पहिली विडंबनात्मक कविता लिहिली.
अस्पृश्य बांधवांनो वडिलांची चाल सोडा
पूर्वीच्या चालीरीती मेलेले मास कहती
वाईट झाली आपुली स्थिति कोणी ना आपणा शिवती
हे काव्य त्यांनी महरकीच्या फार्स मधे लिहिलेले आहे.
Thursday, 27 October 2016
AMBEDKARI MUSIC
आम्बेडकरी संगीत गीतों द्वारा डॉ. बाबासाहब आंबेडकर जी की समतामूलक विचार बहोत खूबसूरत तरीकेसे आम लोगोंतक पहुँचानेका बड़ा कार्य भीमराव करदकजी ने अपने साथियोंके साथ शुरू किया था १९३०-३१ में.
बाबासाहब की हर बातोंको , विचारोंको अपने गीतोंमे लिख गाया बजाया गया और बेहद दूरतक पहुचाया. इसीलिए आज यह परंपरा निर्माण हुई है !
बाबासाहब की हर बातोंको , विचारोंको अपने गीतोंमे लिख गाया बजाया गया और बेहद दूरतक पहुचाया. इसीलिए आज यह परंपरा निर्माण हुई है !
Subscribe to:
Comments (Atom)